आधी रिक्त पदे भरा, तरच शाळेत कामावर येऊ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा शासनास नोटीस

कामठी ता.प्र.दी.१०:- (नागपूर):राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही किंवा त्याची सोडवणूक करीत नाही, तोपर्यंत राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत. असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाने राज्य शासनाला दिला आहे. सन २००५ पासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवर बंदी असल्याने लिपिक,ग्रंथपाल,प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर,तसेच शिपायांची ४५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. अनेक शाळांतील पदोन्नतीचे  प्रलंबित असलेल्या प्रस्तावास मान्यता प्रदान करणे, माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे १०,२०,३० वर्षांनंतरच चा लाभ लागू करणे, २४ वर्षाच्या लाभाबाबत  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस मान्यता देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *